InfoGraph मराठी
20 Jun 2026 06:33 PM
SUBSCRIBE LOGIN
LATEST

श्री पारेश्वर विद्यालय पालखेड ता वैजापूर येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

Admin admin 19 May, 2026 | 08:57 PM
news

पालखेड ता वैजापूर येथे दिनांक १७ मे रोजी २००८.२००९ ला एस एस सी परीक्षा पास झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला.तब्बल १७ वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आले.
     धकाधकीच्या जीवनात घर प्रपंच व जबाबदारीतून थोडा वेळ काढत आपल्या जुन्या मित्र मैत्रिणींशी हितगुज करण्यासाठी व शाळेच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या बॅच मधील अनेक विद्यार्थी बॅंकर्स, एनजीनियर्स, फार्मासिस्टस, एग्रीकल्चर, शिक्षण व इतर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. तसेच अनेक विद्यार्थी शेती पशुपालन या व्यवसायात यशस्वी झाले आहेत.
          या सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने स्नेहमेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री बी एस चव्हाण अध्यक्ष स्थानी होते. श्री एस पी मुलमुले, श्री एस पी कोठुळे, श्री एन एस तांगडे, श्री गुंजाळ, श्री बनाइतकर व श्री भूजाडे एस टी,एन आर शिंदे, ए जी राऊत,एस एम निकम, श्री टी पी बोडखे, श्री डी एस जाधव, श्रीमती ज्योती तारू या शिक्षकांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी श्री अमोल जाधव, श्री संदीप पवार, निलेश जाधव, रामेश्वर जगताप , संजय मोकाटे, शिवाजी घोडके, समाधान भाडाईत, संदीप डमाले सोन्याबापू लाड, तौसिफ शेख ,आरती जगताप, रूपाली गाडेकर, कल्याणी पवार, मीना पवार ,सोनाली त्रिभुवन, श्रद्धा मोरे, अश्विनी मुलमूले, या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
       शाळेच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरील कमान शाळेला भेट दिली.संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील शेळके सचिव श्री विजय कुमावत साहेब यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

शेअर करा:
संबंधित बातम्या